वास्तुशास्त्रात उंबरठ्याचे महत्व.

उंबरठ्याचे महत्व

वास्तूशास्त्रानूसार , घराच्या मूख्य प्रवेशद्वाराजवळील उंबरठ्याला फार महत्व आहे. घराचा उंबरठा हा पृथ्वी , सौर , व चांद्र उर्जेचं संतूलन राखतो , फक्त तो वास्तूशास्त्राप्रमाणे असेल तर घरातील व्यक्तींना सुपरिणाम मिळवुन देतो.

घराला असणारा हा उंबरठा कमी खर्चाचा असून घरातील व्यक्तींना भाग्योदय करून देणारा असतो.

पॉझेटिव व निगेटिव अशा दोन प्रकारच्या उर्जा असतात,लश्मी हे वैश्विक उर्जेचे पॉझेटिव एनर्जी असते , हि एनर्जी ज्या मूख्य दरवाज्यातून आत येते तीकडे विषेश लक्श पूरवावे.

लश्मी घरात येणे म्हणजे योग , शेम , आयु , कल्याण , मांगल्य या पंच परमष्रेश्ठीची प्राप्ती होते , भाग्यकल्प होतो. मुख्य दरवाजा घराचे मुख आहे , जर मुख अस्वच्छ , जंन्तूसंसर्गाचे असेल तर काय दूषित उर्जा आपल्या घराचं स्वास्थ्य टिकवू शकेल का? हिन्दु परंपरेत त्याला मर्यादेचं प्रतीक मानलय .

उंबरठ्याशीवाय घराची चौकट पूरी होत नाही . उंबरठ्याने एक सीमारेषा तयार होते. वास्तुपुरूष डिफाईन होत नाही. त्यामुळे घराबाहेरील दोषांचा त्रास होत नाही. दरवाजा चौकोनीच असावा . उंबरठ्याने त्याची चौकट पूर्ण होते . अर्धवर्तूलाकारात दरवाजा नसावा .

दरवाजा त्रीकोणी असेल तर घरात स्री ला पीडा उद्भवते. उंबरठा हा चांगल्या प्रतीचा, लाकडाचा असावा. लाकुड एकाच प्रतीचे पुल्लींगी झाडाचे वापरावे. दरवाजाला दोन कवाड असतील तर डांव कवाड मोठं व उजव्या बाजूचं कवाड लहान असाव . डांव कवाड मातृ कवाड व उजव कवाड पुत्रीका कवाड अशी संञा आहे.

दरवाजा प्रमाणबध्द असावा दरवाजा उघडताना अडकणारा , आवाज करणारा , बुटका किंवा अति उंच , फुगलेले , पातळ , कललेल , तिरके , डाग पडलेले, भेगा पडलेले ,रंग उडालेलं असू नयेत.

१) बृहत्संहिता ग्रंथात म्हटलय की , दरवाजा प्रमाणापेक्शा उंच असेल| तर शासन भय , प्रमाणापेक्शा कमी असेल तर चोर भय व दुःख देतो

२) मध्यभागी ( ओव्हल आकासारख्या विस्तृत असेल तर हाव वाढवतो . उघडण्यास कठीण ( कुब्ज ) असेल तर कूलनाश होतो . अतिपीडीत उंबरास टेकणारा असेल तर गृहस्वामीला पीडा करतो . घराच्या दिशेने त्याचा तोल गेलेला असेल तर मृत्यू सारख्या घटना घडतात. बाहेरच्या दिशेने कललेला असेल तर गृहस्वामीला अकारण प्रवास करायला लावतो.

 

वास्तुशास्त्रात उंबरठ्याचे महत्व.

वड, पिंपळ काय किंवा उंबर काय, या सर्व झाडांना आपण पवित्र मानतोच. बहुतेक गावात एक पूर्ण वाढलेले वडाचे नाहीतर पिंपळाचे झाड असतेच. उंबराचे झाडही आपण पवित्र मानतो.

नृसिंहानी हिरण्यकश्यपुचा वध केला तेंव्हा नृसिंह अत्यंत क्रोधीत झाले होते, काहि केल्या त्यांच्या शरीराचा दाह कमी होत नव्हता, उंबराच्या फळामध्ये नखे रोवल्यानंतरच त्यांचा क्रोध हळू हळू कमी होऊन नृसिंहस्वामी शांत झाले. उंबराच्या फळामधील शांतरसाच्या गुणधर्मामुळेच उंबरठ्याची संकल्पना आली.

घरातील प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश करताना, उंबरठा ओलांडल्याने त्याचे मन शांत व्हावे , घरात शांतता प्रस्थापित व्हावी, सकारात्मक उर्जा प्रस्थापित व्हावी हि खरी या मागील संकल्पना आहे. उंबराच्या पूर्ण वाढलेल्या झाडाच्या मूळाशी पाण्याचा वाहता झरा असतो, असे आढळल्यामूळे, नवीन विहिर खोदताना, हा निकष लावला जातो.

उंबराच्या झाडाखालून जाताना, एकतरी उंबर खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नये, असा संकेत आहे.

गडकिल्ले भटकताना, कुठेही उंबराचे झाड दिसले, तर आवर्जून उंबराची फळे खावीत. हे फळ खाल्यास बराच वेळ तहान वा भूक लागत नाही.उंबराचे लाकूड मजबूत असते. ते लवकर कूजत नाही. पुर्वी घराच्या दारात आवर्जून उंबराची फळी ठोकली जात असे.

म्हणून तर त्याला उंबरठा म्हणायचे. सध्या उंबरठ्याच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे लाकूड वापरण्यात येते. काहि जण लाकडा ऐवजी फरशी बसवितात, हे काही योग्य नाही असे मला वाटते.

 

Leave a Reply

error: Content is protected !!