रुद्राक्ष नेमकं काय आहे ? रुद्राक्ष कसा ओळखावा?

रुद्राक्ष हे एलिओ कार्पस गॅनितट्रस या झाडाचे फळ आहे. या झाडाच्या आतापर्यंत ३६ जाती आढळल्या आहेत्. रुद्राक्षाचे फळ आवळा, बोर किंवा वाटाण्याच्या आकाराचे असते. पिकलेल्या फळाचा वरचा गर काढुन टाकले कि आतमध्ये रुद्राक्ष मणि मिळतो. आज, नेपाळ मध्ये रुद्राक्ष आधुनिक साधनांनी स्वच्छ केले जातात्.

रुद्राक्षांची उत्पत्ती कशी झाली?

रुद्राक्ष जाबालोपनिषद ग्रंथामध्ये संगितल्याप्रमाणे त्रिपुरासुर दैत्यांच्या नाश करण्यासाठी व पृथ्वीवरील दु:ख, दैन्य दुर करण्यासाठी रुद्राक्ष निर्मिती झाली आहे. या दैत्यांनी तप केल्यामुळे त्यांना ब्रह्मदेव व भगवान शंकराचा वर प्राप्त झाला होता. पण पुढे ते अत्याचार करु लागले.

देवतांनी भगवान विष्णुंना विनंती केली. त्यांनी भगवान शंकराला त्रिपुर नगरीत वेद-विरोधी आचरण सुरु असल्याचे निदर्शनास आणुन दिले.

तेव्हा भगवान म्हणाले:

त्रिपुर वधार्थमहं निमिलिताक्षोभवम्| तेभ्यो जलबिन्दवो भुमौ पतिस्तास्ते रुद्राक्षा जाता: ||

दिव्य वर्षे सहस्त्राणि चक्षुरुन्मिलितं मया| भुमावक्षिपुटाभ्यां तु पतिता जलबिन्दव:||

तत्राश्रुबिन्दवो जाता महारुद्राक्षवृक्षका:| स्थावरत्व मनुप्राप्य भक्तानुग्रहकारणात ||

(त्रिपुरासुरास मारण्याचा निश्चय करुन मी डोळे मिटले. एक हजार दिव्य वर्षांनंतर मी डोळे उघडले तो त्यातुन जे अश्रु पडले त्यांचे महारुद्रक्षांचे वृक्ष बनुन भक्तांच्या कल्याणासाठी स्थावर झाले).

 

रुद्राक्षांची झाडे कुठे-कुठे आढळतात्?

ही झाडे मनिला, ब्रह्मदेश्, भुतान्, बंगाल, आसाम, इन्डोनेशिया, भारतातील हरिद्वार्, रामेश्वरम, नाशिक्, इ प्रदेशात आढळतात्. पण यांना हवे ते तापमान समुद्रसपाटीपासुन २००० मिटर उंचावर म्हणजे नेपाळच्या पशुपतिनाथाच्या भुमि आढळते आणि म्हणुनच इथले रुद्राक्ष सर्वोत्तम मानले जातात्.

कोणते रुद्राक्ष सर्वोत्तम मानले जातात ?

आकाराने समान्, गुळगुळीत्, टणक, मोठे, पुर्ण गोलाकार, निक़ोप आणि नैसर्गिक छिद्र असलेले रुद्राक्ष उत्तम सांगितले आहेत.

नेपाळी रुद्राक्षच सर्वोत्तम का मानले जातात ?

नेपाळ हा शिवप्रदेश आहे. इथेच खरे शिववन आहे. हिमालय हा भगवान महादेवाचा प्रांत आहे. कैलास आणि त्यापलिकडे नेपाळच्या तराई वनामध्ये रुद्राक्षांची वने आहेत्. आज ती अगदी दुर्गम भागात आहे. तिथे पोहोचणे ही दुरापास्त आहे.

म्हणुनच आज नेपाळ मध्ये रुद्राक्षांची शेती केली जाते. इथले रुद्राक्ष टणक, मजबुत्, अत्यंत मनोहारी आणि सुलक्षण असतात्. वेगवेगळ्या प्रदेशातील रुद्राक्षमणि दिसायला वेगवेगळे असतात पण सारखे जरी दिसले तरी प्रत्येक मण्याची शक्ति वेगळी असते.

५ मुखी रुद्राक्ष

खरा रुद्राक्ष कसा ओळखावा?

प्राचीन ग्रंथामध्ये दिले आहे कि खरा रुद्राक्ष पाण्यात बुडतो. पण लोकसमज असा झाला कि जो बुडत नाही तो खोटा किवा नकली रुद्राक्ष्. वस्तुस्थिती अशी आहे कि, पुर्ण परिपक्व रुद्राक्ष पाण्यात बुडतो, पण हे जरुरी नाही.

पण लोकांच्या या समजापायी कि फक्त बुडणारेच रुद्राक्ष खरे असतात्, काही व्यापारी खोट्या रुद्राक्षामध्ये पारा किवा शिसे भरुन ते जड करतात जेणेकरुन ते पाण्यात सहज बुडतात्.

कालानुसार्, आज नेपाळ मध्ये रुद्राक्षांची शेती होते. रुद्राक्षांची फळे माकडे व वटवाघुळांना आवडतात्. म्हणुन त्यांच्यापासुन या अति मुल्यवान फळांचे रक्षण होणे गरजेचे असते. शिवाय रुद्राक्ष ही जगभरात कोट्यावधी डॉलर्सची बाजारपेठ आहे.

त्यामुळे शेतकरी ही फळे थोडी अगोदरच काढुन्, स्वच्छ करुन ठेवतो.

काही रुद्राक्ष फळे मुळातच जड, तर काही थोडी हलकी असतात्. म्हणुन काही बुडतात्, तर काही तरंगतात्. पण म्हणुन ती खोटी ठरत नाहीत्.

तरंगणारे मणि जर काही दिवस तीळ किंवा मोहरीच्या तेलात भिजत ठेवले तर ती ही जड होवुन पाण्यात बुडु लागतात्.

२१ मुखी रुद्राक्ष

अस्सल रुद्र मण्यांची परिक्षा कोणती?

प.पु. गुरुमाउलींनी दिन्डोरी दरबारात खालील परिक्षा संगितली आहे. रुद्राक्ष मण्याला किंवा माळेला जर त्यांच्या धाग्याने उजव्या हातात धरुन त्यावर जर महामृत्यंजय मंत्र म्हटला तर तो मणि किंवा ती माळ मागे-पुढे किवा मंडलाकार फिरु लागते.

परंतु, परिक्षा घेत असलेल्या व्यक्ति व त्याच्या सेवेवर सुद्धा या मण्याचे हलणे वा ना हलणे अवलंबुन असते. शिवाय कोरीव काम करुन मुखी वाढवलेले मणि जरी खरी असले तरी त्यांची मुखे खोटी असतात ही बाब ही सेवेकरी वर्गाने लक्षात ठेवण्याजोगी आहे.

१७ मुखी रुद्राक्ष

खोटे रुद्राक्ष?

हो खोटे रुद्राक्ष विकले जातात्. पाच मुखी रुद्राक्ष विपुल प्रमाणात मिळतात्. त्यांची पावडर बनवुन नंतर त्याचे हव्या त्या मुखीचे रुद्राक्ष बनवले जातात्. सुपारीला कोरुन ही नकली रुद्राक्ष बनविले जातात्. पण एखादी पारखी व्यक्ति हे लगेच ओळखु शकते. शिवाय अनेक खरे रुद्राक्ष जोडुन त्यांचे गौरीशंकर म्हणजे जोड रुद्राक्ष किंवा नंदी किंवा नाग रुद्राक्ष बनवितात् .

हे सहसा बनावट असतात्. काही व्यापारी, खृया ५ मुखी वर मशीनने कोरुन त्याला ७ किंवा आठ मुखी करतात्. किंवा १२ मुखी ला चौदा मुखी करुन विकतात्. हे साधारणपणे लगेच ओळखु येत नाही. अशा प्रकारे मुखी वाढविले तर किंमत अनेक पटींनी वाढते.

आता, हे कोरीव काम केलेले रुद्राक्ष ही खरे असल्यामुळे पाण्यात बुडतील्. पण ते खरे नव्हेत्. असे रुद्राक्ष धड बारा मुखी चे ही फळ देणार नाहीत अन चौदा मुखीचे ही. उलट एक विटंबना केलेला शिवमणि म्हणुन त्यांच्यापासुन नुकसानच होवु शकते.

याकरितां, रुद्राक्ष हे नेहमी अत्य़ंत विश्वासु व्यक्तिकडुन किवा त्या ही पेक्षा आपल्या श्री गुरुंकडुन प्राप्त करणे केव्हाही स्वर्गाहुन सुखकर होय्.

३ मुखी रुद्राक्ष

रुद्राक्षांमध्ये कोणते रासायनिक पदार्थ आढळतात्?

गॅस क्रोमॅटोग्रॅफी च्या परिक्षणानुसार्, रुद्राक्षांमध्ये 50.031 % कार्बन्, 0.95% नत्र, 17.897% हायड्रोजन्, आणि 30.53% ऑक्सिजन आढळतो.

रुद्राक्षांचे किती प्रकार असतात्?

रुद्राक्षांच्या मुखाप्रमाणे १ मुखी पासुन ते २७ मुखी पर्यत रुद्राक्ष आजही आढळतात्. मुख म्हणजे रुद्राक्षाच्या वरील भागावर छिद्राच्या एका टोकापासुन दुसर्या टोकापर्यत जाणारी कोरीव रेष्. साधारणत: पाच मुखी मणि जास्त आढळतात्. मुखींप्रमाणे त्यांचे मह्त्व व ला सांगितले आहेत्.

 

सर्वात श्रेष्ठ रुद्राक्ष कोणता?

याचे वास्तविक उत्तर हे आहे कि जो रुद्राक्ष सदगुरुंनी आपल्या भक्तांना प्रदान केला तो रुद्राक्ष जगातील सर्वश्रेष्ठ रुद्राक्ष होय्. मग तो कितीही मुखी असो.

साधारण्पणे सद्गुरु आपल्या भक्तांना पाच मुखी, एक मुखी, गौरीशंकर, किंवा चौदा मुखी रुद्राक्ष प्रदान करतात्.

यातील्, एक मुखी आणि चौदा मुखी अत्यंत दुर्मिळ मणि होत्.

रुद्राक्ष घेतल्यावर काय करावे?

सहसा, सदगुरुंकडुन प्राप्त केलेल्या रुद्राक्षांचे विशेष पुजन करण्याची आवश्यकता नसते. तो मणि प्रत्यक्ष शिवांश असतो.

असा मणि प्राप्त केल्यानंतर आपण तो आधी गोमुत्राने पवित्र करुन घेतो व नंतर त्याला पंचामृताने स्नान घालुन त्यावर दुग्धाभिषेक करत शिवमंत्र पठन करतो.

यामध्ये, शिवनामावली, शिवमहिम्न, रुद्रसुक्त्, शिवकवच्, कालभैरवाष्ट्क इ म्हणतो. याबरोबरोबरच या मण्यावर अखंड बिल्वार्पण करतो.

रुद्राक्षांवर आपण खालील मंत्र १०८ वेळा देखील म्हणतो.

ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिम पुष्टीवर्धनम्, उर्वारुकमिव बन्धनान्,

मृत्योर्मुक्षीय मामृतात ॐ ॐ अघोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोर तरेभ्य:

सर्वेभ्य सर्व शर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्य:

रुद्र मण्याला मात्र आपण हळद्-कुंकु, अष्टगंध, इ वाहत नाही कारण ते गंध मण्याच्या मुखामध्ये जावुन मण्याला किड लागण्याचे प्रकार घडतात्. पुजा केलेल्या मण्याला पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालुन्, तिळाच्या तेलात बुडवुन्, स्वच्छ कोरड्या कापडाने पुसुन कोरडा करुन घेतो.

नंतर्, नैसर्गिक चंदन अत्तर् लावुन शिवपिंडीवर किवा जवळ ठेवुन देतो.

रुद्राक्षावर जास्त काळ फुल इ ही आपण अर्पण करत नाही कारण फुलांमधील परागकणांमुळे ही रुद्र मण्यांना किड लागायची शक्यता असते.

————————————————————

Leave a Reply

error: Content is protected !!