चित्रपटाच्या एन्ट्री दृश्यातच तमाम महिला वर्गाच्या शिव्या खाणारा नटसम्राट !- निळू फुले

” ८० ते २००० च्या दशकांमध्ये या मराठी अभिनेत्याचा पडद्यावरील दृश्यांत प्रवेश जरी झाला तरी वयोंवृध्द ते तरुणमहिलांपर्यंत सगळया महिलामंडळी आपल्या हातांची बोटे मोडत शिव्यांचा बार चालु करत असे …………

ऐवढ्या सहजतेने जिवंत खलनायकाची भुमिका निळुभाऊ फुले हे चिञपटसृष्टीतील रंगमंचावर साकरत होते “……………..!!! ”

निळकंट कृष्णाजी फुले ऊर्फ निळू फुले ” यांचा जन्म १९३१ ला पुण्यातील सर्वसामान्य माळी कुटुंबात झाला ………” त्यांचे वडील लोखंड व भाजीपाला विकण्यांचा काम करत असत …….. परिस्थिती बेताची होती म्हणुनचं इच्छा असतानाही निळुभाऊ हे मॅट्रीकच्यावर आपले शिक्षण पुर्ण करु शकले नाहीत ……….

शिक्षणानंतर ते पुण्यातील वानवडीमधील लष्करी महाविद्यालयांत ‘ माळी ‘ कामगार म्हणुन रजु झालेत …………….दिवसा माळी काम करुन राञीस वंगनाट्य लिखानांचे काम निळुभाऊ न चुकता रोज करत असत ……….

त्या वेळेस ते सेवादलांमध्येही कार्यरत होते म्हणुनचं माळी काम करुन आपल्याला भेटणाऱ्या ८० रुपये वेतनांतील १० रुपये हे सेवादलांस देणगी स्वरुपांमध्ये देत असत ……….. १९५७ सालांच्या संयुक्त महाराष्ट्रांच्या उठांवाच्या लढायांसाठी त्यांनी ‘ येडा गबाळ्याचे काम नव्हे ‘ हा वग लिहिला व या वगाअंतर्गत निळुभाऊचा खऱ्या अर्थाने नाट्य-चिञपटसृष्टींत प्रवेश झाला …………..

त्यानंतर त्यांनी माळी काम सोडुन पुर्ण वेळ लिखान काम चालु केले ……….. पु.ल. देशपांडे यांच्या नाटकांतील ‘ रोंगे ‘ या भुमिकातुन त्यांचा कलामंचावर कलाकार या नात्यांने प्रवेश झाला व त्यानंतर अनंत माने यांचा तमाशापट ‘ एक गाव बारा भानगडी ‘ यांच्यामधील रांगड्या ग्रामीण कलाकारांची भुमिका त्यांनी खऱ्या अर्थाने प्रसिध्दी देऊन गेली व येथुनचं निळुभाऊने पुन्हा कधीचं मागे वळुन बघितले नाही ……….

त्यानंतर त्यांनी १४० मराठी व १२ हिंदी चिञपटांत काम केले ………… हिंदीमधील ‘ कुली ‘ या चिञपटांतील अमिताभबरोबरची भुमिका प्रचंड गाजली ही भुमिकेतुन त्यांनी हिंदीतही आपला वेगळा ठसा निर्माण केला …………..

मराठीतील सामना , सिंहासन व पिंजरा यांमधील निळुभाऊचे शब्द आजही लोकांच्या स्मरणांत आहेत व त्यांचबरोबर ‘ बाई वाड्यावर या ‘ हे निळुभाऊचे वाक्य त्यांच्यानंतर आजही तरुण वर्गांस भुरळ घालत असते ऐवढे प्रचंड मराठी ग्रामीण भाषांवर निळुभाऊचे वर्चस्व होते ………….

गावांचा पाटील बोलके जनमाणसांत निळुभाऊने साकारलेल्या पाटीलाची भुमिका रसिकजणांच्या डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाही ऐवढे वास्तववादी चिञ महाराष्ट्रांतील रसिकजणांच्या हद्रयांत निळुभाऊने कोरुन ठेवले आहे “…………….. !!!!!

‘ तुला पाहते रे ‘ ही झी मराठी वाहिनीवर ८:३० वाजता प्रर्दशित होणाऱ्या मालिकांतील ‘ ईशा ‘ च्या आईची भुमिका साकारणारी व्यक्तीरेखा म्हणजेच ‘ गार्गी फुले ‘ ही निळुभाऊची सुकन्या …………..

निळुभाऊ हे नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबर अंधश्रध्दा निर्मुलन समितीअंतर्गत समाजांतील अंधश्रध्दा दुष्प्रचार थांबवण्यांसाठी वैयक्तीकरित्या जमिनीवर काम करत होते ……….. निळुभाऊ हे अनेक दिवस अन्ननलिकेच्या कर्करोगाने ञस्त होत यामुळेचं आपल्या आयुष्यांच्या शेवटच्या क्षणांत ते अंथरुणास खिळुन होते व यांमधुनच त्यांची प्राणज्योत १३ जुलै २००९ साली पुण्यांतील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मावळली ” …………..!!!!

“शेवटी काय चिञपटसृष्टीत खलनायकांची भुमिका निभवणारे निळुभाऊ हे वास्तविक जीवनांतील खरे-खुरे नायक होते ……….

वास्तविक जीवनांमध्ये त्यांनी प्रत्याक्षांत जमिनीवर उतरुन समाजांतील शोषित ,वंचित, गरजु व गरीब जनमाणसांसाठी विविध माध्यमांतुन संघर्ष केला म्हणुनचं अश्या हुरहुनरी महानायकांस महाराष्ट्रांतील तमाम मराठी रसिकजणांवकडुन मानाचा मुजरा “…………!!!

लेखक-श्री रितेश राजाराम काळोखे (९३२५८९१९२३)

Leave a Reply

error: Content is protected !!