शरीरावरील तीळ आणि मनुष्य स्वभाव !

आपल्या शरीरावर जन्मापासूनच जे काळे छोटे मार्क्स/ चिन्ह असतात त्याला आपण तीळ म्हणतो.

ज्योतिष शास्त्रानुसार तीळेचा स्वभाव आणि भविष्यावर सरळ सरळ परिणाम होता. जाणून घ्या तिळेच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य कसं असतं ते…

१. दोन्ही भुवयांच्यामध्ये जर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप हुशार असते. हे लोक आपल्या तल्लख बुद्धीनं कार्यात यश आणि पैसा प्राप्त करू शकतात.

२. जर कोणत्या व्यक्तीच्या उजव्या बाजूला डोळ्यांच्या कॉर्नरवर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप भावूक असते. असे लोक दुसऱ्यांवर जळणारे पण असू शकतात.

३. ज्या व्यक्तींच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असेल तर असे व्यक्ती बौद्धिक क्षमतेच्या बाबतीत इतर लोकांच्या तुलनेत खूप पुढे असतात.

बौद्धिक कामांमध्ये त्यांना खूप आनंद मिळतो.

४. ज्यांच्या उजव्या डोळ्याखाली तीळ असतो, ते व्यक्ती खूप कामुक असतात. प्रेमाच्या बाबतीत इतरांपेक्षा या व्यक्ती खूप भावुक असतात आणि दुसऱ्यांना मदत करणं त्यांना आवडतं.

५. ज्या व्यक्तींच्या डाव्या डोळ्याखाली आणि नाकाजवळ तीळ असतो. ते स्वभावानं अतिशय गूढ असतात. त्यांना समजणं इतरांसाठी कठीण काम असतं.

६. जर कोणत्या व्यक्तीच्या नाकाच्या सुरुवातील म्हणजे समोर मध्यभागी तीळ असेल तर असे लोक कल्पनाशील असतात.

कोणतंही काम हे लोक रचनात्मक पद्धतीनं करणं पसंत करतात.

७. ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याच्या खाली आणि नाकाजवळ तीळ असेल ते दुसऱ्या लोकांवर जळणारे असू शकतात. असे लोक स्वत:बद्दल जास्त विचार करतात.

८. जर कुणाच्या डाव्या डोळ्याच्या अगदी खाली तीळ असेल तर ती व्यक्ती कामुक असते. त्यांच्या जोडीदाराला त्यांचा हा स्वभाव जानवतो.

९. ज्यांच्या डाव्या डोळ्याच्या कॉर्नरला तीळ असतो, ते आपल्या जोडीदारासोबत खूप भांडतात. आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराला मिळविण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात.

१०. डाव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असले तर समजून घ्या ते डोक्यानं खूप जलद असतील. असेलोक आपल्या धोरणांमुळे मोठ्या प्रयत्नांनी कामांमध्ये यश मिळवू शकतात.

११. जर कुणाच्या नाकावर तीळ असेल तर ते व्यक्ती खूप प्रवास करणारे असतात. अशा व्यक्तींना प्रेमप्रकरणांमध्ये काही समस्या येऊ शकतात.

१२. ज्यांच्या उजव्या गालाच्या हाडावर तीळ असतो, ते भावुक असतात. आपल्या भावनांमुळे ते अडचणींमध्ये अडकू शकतात.

१३.  उजव्या गालावर तीळ असणारे व्यक्ती खूप कामुक असतात. पण वेळोवेळी त्यांचे जोडीदारासोबत मतभेद होत असतात.

१४. उजव्या बाजूला नाकाच्या बरोबर खाली तीळ असेल तर ते व्यक्ती विचारांनी खूप श्रेष्ठ असतात. मात्र असे व्यक्ती खूप गूढ असतात.

आपलं कोणतंही सिक्रेट ते इतरांना समजू देत नाहीत. त्यांचं भाग्य उत्तम असतं.

१५. जर नाकाच्या मध्ये खाली तीळ असेल तर अशा व्यक्तींना स्वतंत्रपणे जगणं आवडतं. त्यांना प्रवास खूप आवडतो.

१६. ज्या लोकांच्या ओठांच्यावर डाव्या बाजूला तीळ असतो ते लोक आपल्या मुलांवर खूप प्रेम करणारी असते. त्यांच्या उदारपणामुळे कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.

हे लोक विश्वास करण्यासारखे असतात.

१७. जर कुणाच्या नाकावर उजव्या बाजूला तीळ असेल ते व्यक्ती खूप कलात्मक पद्धतीनं काम करतात. असे लोक अनेकदा आपल्या कामांनी दुसऱ्यांना धक्का पोहोचवतात. यांचे अनेक प्रेम प्रकरणं होऊ शकतात. मात्र लग्नानंतर हे व्यक्ती आपल्या जोडीदाराप्रतीच समर्पित असतात.

१८. उजव्या बाजूला ओठांच्यावर तीळ असेल तर ते व्यक्ती आपलं काम योग्य पद्धतीनं काम करतात. हे लोकं बुद्धीमान असतात आणि त्यांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते.

१९. जर कुणाच्या उजव्या बाजूला ओठांच्या अगदी कॉर्नरवर तीळ असेल तर ती व्यक्ती प्रेमळ स्वभावाची असते. जोडीदारासोबत ते खूप प्रामाणिक असतात.

कधी-कधी त्यांच्या स्वभावात मत्सर निर्माण होतो.

२०. ज्या लोकांच्या डाव्या बाजूला गालाच्या हाडावर आणि कानाच्या अगदी जवळ तीळ असेल, त्यांना समजून घेणं खूप कठीण असतं. असे लोक चांगले नियोजन करू शकतात.

२१. ज्यांच्या डाव्या बाजूला गालाच्या हाडावर आणि कानाच्या थोडं दूर तीळ असेल, त्यांची बौद्धिक क्षमता खूप चांगली असते. त्यांना एकसारखं जीवन जगणं आवडतं. काळासोबत आयुष्य बदलणं त्यांना आवडत नाही.

२२. डाव्या बाजूला ओठांच्या बरोबर कॉर्नरला तीळ असेल, असे व्यक्ती खूप कामुस असतात. कामुक स्वभावामुळे त्यांच्या जीवनात अनेकदा त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो.

२३. जर कुणाच्या चीनवर डाव्या बाजूला तीळ असेल, अशा व्यक्ती धार्मिक बाबतीत आवड असणारे असतात. भौतिक सुख-सुविधांकडे ही अशाव्यक्ती आकर्षित होतात.

२४. ओठांच्या अगदी खाली तीळ असेल तर अशा व्यक्तींमध्ये असुरक्षिततेच्या भावनेनं आपलं आयुष्य जगतात. त्यांना यश मिळण्याबाबतही संशय असतो. आरोग्याच्या बाबतीतही त्यांना सावध राहण्याची गरज आहे.

२५. ज्यांच्या चीनवर म्हणजेच दाढीवर तीळ असतो, ते व्यक्ती परंपरावादी असतात. असे लोक कुटुंबियांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. इतर लोकांशी त्यांचे संबंध चांगले असतात. तसे तर हे लोक स्वभावानं खूप शांत असतात, मात्र कधी-कधी त्यांना राग येतोच. कोणतंही काम हे लोक प्रामाणिकपणे करतात.

(वरील माहिती १०० % खरी असेल असे नाही,व्यक्ती स्वभाव,भौगोलिक,आर्थिक परिस्थिती नुसार बदल संभवतो)

Leave a Reply

error: Content is protected !!