बहुगुणी आलं…

बहुगुणी  आलं

 

अद्रक (आले) ही औषधी वनस्पती मानली जाती. आल्यापासून आपल्याला नियमित दिनचर्येमध्ये खूप फायदे होतात. आले सेवनामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

तर चला पाहूया या आल्याचे आपण किती फायदे करून घेऊ शकतो.?

आल्यामध्ये ९१ टक्के पाणी, २.५ टक्के प्रोटीन, १३ टक्के काबरेहायड्रेट असतात. यामुळेच याला बहुगुणी म्हटले जाते.

१.खोकला झाल्यावरही हे उपयुक्त असते. आल्याचे बारीक काप करून त्याचे तुकडे व एक सारख्या प्रमाणात मधासोबत गरम करून दिवसातून दोन-तीन वेळा खावे. खोकला येणे बंद होते. त्याचसोबत घशातील खवखव सुद्धा कमी होते.

२.तुम्हाला भूक लागत नसेल तर आल्याचे नियमित सेवन करावे, त्याने तुमचे पोट साफ होते व तुम्हाला भूकही लागते.

३.अँसिडिटी या आजारावरही आलं उपकारक आहे. आल्यामध्ये ओवा आणि लिंबूचा रस एकत्र करून त्यात थोडे मिठ टाकून खावे. त्यामुळे पोटाचे आजार कमी होतात व ढेकरही येत नाही.

४.जर वारंवार उलट्या होण्याची समस्या असेल तर आलं कांद्याच्या रसासोबत दोन चमचे प्यावे. यामुळे उलटी होणे थांबते.

५.सर्दी झाल्यावर आल्याचा चहा पिणे फायदेशीर असते.

६.आल्याचा रस कोमट पाण्यात १ चमचा टाकून प्यावे. तोंडातील दुर्गंधी ताबडतोब जाते.

७.ताज्या आल्याची फोड तोंडात ठेवल्यास उचकी थांबते.

८.आल्यांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते. त्यामुळे रक्ताच्या गाठी बनण्यास प्रतिबंध करता येतो. तसेच कर्करोगाच्या प्रतिकारासाठी ही आलं वापरतात.

९.डोके दुखत असल्यास आल्याचा चहा प्यावा डोकेदुखी कमी होते.

आल्याचे पिक ७ महिन्यात तयार होते. मात्र आले सुन्ठीकरता लावले असल्यास ८.५ ते ९ महिन्यात पीक तयार होते. जानेवारी महिन्यात पाने पिवळी पडून वाळू लागतात. वाळलेला पाला कापून पाला पाचोळा वेचून घ्यावा.

कुदळीने खोदून आल्याच्या गड्डयांची काढणी करतात. खणताना गड्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. आले वेचून पाण्याने स्वच्छ धुवून गड्डे व बोटे (नवीन आले)  वेगवेगळी करावी.

हेक्टरी उत्पादन १०-१५ टनापर्यंत येऊ शकते. काढण्याच्या वेळी चागला भाव नसेल तर आले न काढता त्यास दर १० दिवसनी पाणी देणे चालु ठेवतात.

एप्रिल अखेर कंदावर पुन्हा फुटवे येऊन त्याची वाढ सुरु होते.

त्यानंतर त्यास वाढ व पोषणासाठी आधीच्या पोषणाइतकीच खते द्यावीत. अशा द्वी हंगामी पीकही काढणी पुढील ऑगस्टमध्ये करतात. या पिकाचे उत्पादन हेक्टरी ३० ते ४० टनापर्यंत येते.

आले जमिनीतून काढल्यानंतर त्यावरील माती पाण्याने धुवून काढतात व आले स्वच्छ धुवून करतात. उन्हात सुकविल्यावर हे आले पुन्हा पाण्यात भिजू देतात.

साल नरम झाल्यावर आले पाण्यातून काढून त्यावरील साल कोरड्या फडक्याने घासून काढतात.

त्यानंतर चुन्याच्या निवळीत तीन टप्प्याने भिजत ठेवावे. त्यानंतर हवाबंद खोलीत गंधकाची धुरी देतात. परत उन्हात सुकवून ६ तास गंधकाची धुरी देतात.

नंतर उन्हात चांगले सुकतात.

अशा तऱ्हेने तयार झालेली सुंठ ओल्या आल्याच्या मानाने १५ ते २० टक्के या प्रमाणात मिळते दर हेक्टरी ७५०० किलो आले १८५० किलो सुंठ मिळते

 

1 thought on “बहुगुणी आलं…

Leave a Reply

error: Content is protected !!