काखेतील दुर्गंध ने त्रस्त आहे का ? मग वाचा हे !

कामाच्या ठिकाणी तुमच्या भोवती जर सतत माणसांची गर्दी असेल, तर घामाची दुर्गंधी हा तुमच्यासाठी एक महत्त्वाची समस्या होऊन बसते. काखेतून येणारा दुर्गंध अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आपल्याला लाज आणू शकतो.

त्यापासून वाचण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. रोज अनेकदा आंघोळ करुनही यात काही फारसा फरक पडत नाही. पण, मग ही दुर्गंधी थांबवायची कशी?

१)  तुम्ही दररोज अनेकदा आंघोळ केली तरी ही दु्र्गंधी कमी होण्याची तितकीशी शक्यता नसते. कारण, या दुर्गंधीचा तुमच्या आंघोळीशी फारसा संबंध नसतो. तर तज्ज्ञांच्या मते या दुर्गंधीचा थेट संबंध तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयीशी असतो.

२) तुम्ही भरपूर कांदा लसूण खात असाल तर ते कमी करा. कारण, कांदा आणि लसूण यातील काही घटक हे ही दुर्गंधी उत्पन्न करण्यासाठी जबाबदार असतात. भरपूर जीवनसत्व असणाऱ्या फळांचा आणि भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा.

३)  तुम्हाला कॉफी पिण्याची जास्त सवय असेल तर ती लगेचच थांबवा. कारण, घामाला एक विशिष्ट प्रकारचा दर्प देण्यास कॅफेन मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे.

४) तुम्हाला खूप घाम येत असल्यास काखेत लावण्यासाठी मिळणारी लोशन वापरा. त्यामुळे घाम कमी येईल. पण, तुम्ही जर डिओड्रंट वापरणार असाल तर मात्र त्यामुळे तुम्हाला तात्पुरता आराम मिळेल. डिओड्रंट घाम कमी येण्यास मदत करत नाहीत, तर केवळ घामाचा दर्प मिटवतात.

५) दिवसातून किमान दोन वेळा आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर आपल्या काखेत टाल्कम पावडर लावा.

६) शक्य तितके जास्त सुती कपडे वापरा. सुती कपडे घाम कमी आणतात आणि आलेला घाम शोषून घेतात.

७)  तुमच्या काखेत केस वाढले असल्यास त्यात घाम जमा होऊन जीवाणूंची निर्मिती होते. त्याचे रुपांतर पुढे घामाचा दर्प येण्यात होते. त्यामुळे काही दिवसांच्या अंतराने नियमीतपणे तुमच्या काखा साफ करा.

पुरुष सहसा यावर उपाय म्हणून डिपार्टमेंटल स्टोअरमधून दिसेल तो डिओड्रंट घेऊन येतात.

योग्य डिओड्रंट कसा निवडाल?

दुर्गंधीनाशक आणि डिओड्रंट यांच्यातील फरक

सगळेच दुर्गंधीनाशक स्प्रे डिओड्रंट नसतात. त्यातील अल्युमिनिअमच्या अंशामुळे काखेतील संवेदनशील त्वचेतमध्ये ते अडकून बसतात. त्याचबरोबर यामुळे त्या त्वचेभोवती असणारे बॅक्टेरिया मरून जातात आणि एक अतिशय घाणेरडा वास येऊ लागते. यामुळे डिओड्रंट वापरण्याचा उद्देशच अपयशी ठरतो.

रोल आणि स्प्रे

काखेतील केस काढून न टाकणारे लोकांसाठी स्प्रे अत्यंत फायदेशीर ठरतात. स्प्रे मध्ये असणारे हानीकारक द्रव्ये केसांमध्येच अडकून राहत असल्याने संवेदनशील त्वचेपर्यंत ते पोहचत नाहीत. त्यामुळे त्वचेला हानी पोहचत नाही. इतरांनी मात्र सुरक्षेसाठी रोल ऑन वापरावे.

संवेदनशील त्वचा

अनेक पुरुषांची खांद्याच्या भोवतीची त्वचा अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे त्यांना अल्युमिनिअम बेस्ड दुर्गंधीनाशक स्प्रे किंवा अल्कोहोल बेस्ड डिओड्रंट वापरणे मुश्कील होते. त्यामुळे त्यांनी केमिकल्सचा वापर नसलेले हर्बल डिओड्रंट वापरण्यावरच भर द्यावा.

काय कराल?

दुर्गंधीनाशक आणि डिओड्रंट यांचे कॉम्बिनेशन केव्हाही चांगले तंग कपडे घातल्याने जास्ती घाम येतो, त्यामुळे हलके आणि लूझ कपडे घाला. जेव्हा शक्य असेल, तेव्हा शरिरावरील अनावश्यक केस कमी करा, यामुळे घाम कमी येईल तुम्ही काय खाता, यावरही बॉडी ओडर अवलंबून असतो.

कांदा, लसूण चवीला छान असतात, मात्र आहारातील त्याचा वापर मर्यादितच ठेवा.

यापुढे डिओड्रंट निवडताना या टिप्स जरूर लक्षात ठेवा आणि नेहमी फ्रेश रहा.

सौंदर्यप्रसाधनांमध्ये सर्वाधिक वापर हा डिओड्रंटचा केला जातो. शरीराची दुर्गंधी घालवण्यसाठी डिओड्रंटचा वापर नियमितपणे केला जातो. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की डिओड्रंटचा रोजचा वापर तुमच्या शरीरासाठी किती हानिकारक ठरु शकतो.

डिओड्रंटच्या वापराने केवळ तुमच्या स्किनवरच फरक पडत नाही तर तुमच्या स्वास्थ्यावरही त्याचा प्रभाव पडतो. तुम्ही मार्केटमधून जो डिओड्रंट घेता त्यात केमिकल आणि टॉक्सिन असते. डिओड्रंटमुळे कॅन्सरसारख भीषण आजारही होऊ शकतो.

डिओड्रंटमुळे स्वेद ग्रंथी म्हणजेच टॉक्सिन बाहेर निघणाऱ्या ग्रंथी बंद होतात. हे कारण कॅन्सरला कारणीभूत ठरु शकते. तसेच न्यूरोटॉक्सिनमध्ये अल्युमिनियम यौगिक असते ज्यामुळे अस्थमा, अल्झायमरची समस्या उद्भवू शकते. या समस्या न होण्यासाठी डिओड्रंट म्हणून एखाद्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करा अथवा त्याचा वापर कमी करा.

Leave a Reply

error: Content is protected !!