कवडी म्हणजे काय ? त्याचे प्रकार कोणते ?

कवडी

कवड्यांचे प्रकार किती व कोणते?

तसे पाहता बर्याच रंगाच्या व आकाराच्या कवड्या असतात. परंतु पुजे मधे अथवा देवी शृंगारांमधे काही विषेश कवड्यांचा समावेश होतो.

*1)महालक्ष्मी कवडी*

कवडीवर तपकिरी रंगाचे ठीपके.

*2)आंबिका बट कवडी*

खडबडीत व पिवळसर रंगाची *

3)येडेश्वरी कवडी*

राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा

*4)यल्लम्मा कवडी*

शुभ्र व दुधासमान निश्कलंक आराधी लोक ज्या देवीची उपासना करतात. त्या त्या देवींच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश होतो.

कवडी माळ जी आई भवानी सह अनेक देवींच्या गळ्यातील अलंकार आहे.

हे समुद्रात सापडणारे, एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच आहे. याचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे. तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळातपण याचा वापर दान टाकण्यास करण्यात येत असे.

साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गाई, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवड्या अद्यापि वापरण्यात येतात. *तुळजापूर शहरात नवरात्र उत्सवाच्या वेळी कवड्यांच्‍या माळांची शंभरपेक्षा अधिक दुकाने थाटली जातात.*

अनेक आराधी, आराधिनी महिला कवड्यांच्या माळेचा साज घालताना दिसतात.

कवड्यांमध्ये अंबुकी कवडी व येडाई कवडी असे दोन प्रकार असतात. कवड्यांच्या माळा दक्षिणी भारतातील चेन्नई येथून तुळजापुरात आणल्या जातात.

*कवडीच्या महात्म्याच्या वर्णनात एक कथा*

शिव पार्वती भारती मठात सारीपाट खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले’ त्यानी जगदंबा मातेच्या हातातील कवडी कडे पाहताच प्रश्न केला की माते या कवडीत असे काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे? जिच्या निर्णया समक्ष साक्षात महादेव हारवता आहात आपण;

त्यावर महादेवीनी सारीपाटावरील एक कवडी नारदमुनिंच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणुन देण्यास सांगितले. नारद मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन ईंद्र देवांच्या दरबारी पोहोचले.

तिथे कवडी तुल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्र देवांनी व देवेंद्राने विनोदमय हास्य केले. कुबेराने छोटा तराजु घेऊन एका पारड्यात कवडी व दुसय्रा पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोल होईना.

तराजु विशाल झाला कुबेर भांडार खाली झाले ; किंतु कवडी तुल्य धन होईना देवता गणांनी मनोमन क्षमा मागुन देवराज ईंद्राने स्वत:चा मुकुट देखिल पारड्यात टाकला किंतु जगदंबेच्या एका कवडीतोलेल एवढे धन पर्याप्त नाही झाले.

देवराज ईंद्रासह सर्व देव शिव शक्ति समिप आले.अपराध क्षमापण केले. या अपराधाच्या क्षमापणेप्रित्यर्थ ईंद्र व चंद्र देवांनी कल्होळ तिर्थाची निर्मिती केली.

*हेच तुळजापुरातील कल्होळ तिर्थ जे ईंद्र व चंद्र देवानी बांधले असुन. ब्रम्हदेवांनी पृथ्वीवरील सर्व जल तिर्थांना ईथे येण्यास सांगितले या तिर्थांचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र कल्होळ तिर्थ होय*

तेव्हापासुन कवडीला अपार महत्व प्राप्त झाले.

एवढेच काय एके काळी कवडी ही चलनासाठी वापरायचे साधन होते. व्यवहारात कवड्या चलन म्हणुन अस्तित्वात होत्या. राजे महाराजे कवड्यांच्या माळा परीधान करत असत.

कारण कवडी ही सागरातुन निघालेली असल्याने रत्नासमान मोत्यासमान मानली जाते.

पेशवाई काळातही या कवड्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत.

कल्होळ तीर्थ

आपणही कालोघात विसरलो म्हणुन की काय पण कधीतरी म्हणतोच ” काय कवडी किंम्मत केली ” “कवडीमोल विकले गेले ” आता आराधी लोकांत कवडी शृंगार का प्रिय विचाराल तर जे भगवतीला प्रिय ते आराध्यास प्रिय म्हणुन आराधी आजही अनमोल अशा कवड्यासाजाचा शृंगार करतात.

त्यांना तो जिवापाड प्रिय आहे.

 

 

Leave a Reply

error: Content is protected !!